व्हिडिओ अॅप टिक टॉकवर मालकी हक्क असणारी कंपनी ByteDance आता स्वत: स्मार्टफोन क्षेत्रात उतरणार आहे. रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनमध्ये कंपनीचे अनेक अॅप्स प्रीलोडेड असतील. अर्थात अॅप्स डाउनलोड करावे लागणार नाही.
TikTok चा फोन येणार म्हटल्यावर हा फोन शाओमी, ओप्पो आणि विवो यासारख्या लोकप्रिय मोबाईल कंपन्यांना टक्कर देणार आहे. या स्मार्टफोनमधए न्यूज एग्रीगेटर Jinri Toutiao, व्हिडियो अॅपप TikToK प्रीलोडेड असणार. याव्यतिरिक्त यात स्ट्रीमिंग म्यूजिक सर्व्हिस असेल.
रिपोर्टनुसार, ByteDance ने आपल्या स्मार्टफोनसोबतच प्रोडक्ट पोर्टफोलियो मजबूत करू इच्छित आहे. मात्र या स्मार्टफोनबाबत अधिक माहिती समोर आलेले नाहीत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ByteDance चे सीईओ झांग यिमिंग यांचं खूप दिवसांपासून स्मार्टफोन तयार करण्याचं स्वप्न होतं. बीजिंग कंपनीने Smartisan सह डीलची पृष्टी झाली आहे. सोबतच Smartisan च्या काही कर्मचार्यांना हायर केले गेले आहे.
टिक टॉक युजर्सना लक्षात ठेवून हा बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. या दरम्यान iPhone आणि iPad वर टिक टॉक अत्यंत प्रसिद्ध अॅप असल्याचे सांगितले गेले आहे. मार्च 2019 च्या तिमाहीत TikTok ला 3.3 कोटी वेळ्या डाउनलोड केले गेले आहेत. तरी गूगल प्ले स्टोअरमध्ये हा सर्वात पॉप्युलर अॅप नव्हता. गूगल प्ले स्टोअरहून टिकटॉक 88.2 मिलियन वेळा डाउनलोड केले गेले.