Marathi Biodata Maker

शाओमी आज रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो आज लाँच करणार

Webdunia
बुधवार, 17 जुलै 2019 (12:12 IST)
Twitter
शाओमी आज (17 जुलै) रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यासोबतच एक स्पेशल व्हेरिअंटही लाँच करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्पेशल व्हेरिअंटची किंमत तब्बल 4.8 लाख रुपये असेल, असं शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनू जैन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
गेले अनेक दिवसांपासून यूजर्स शाओमीच्या के सीरीजची वाट पाहत आहेत. पण शाओमी आता के सीरीजसोबत यूजर्सला उद्या मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मनू जैन यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये एक फोटोही पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये गोल्ड फिनिशचा नवीन व्हेरिअंट दिसत आहे आणि त्यावर डायमंडमध्ये के लोगो आहे. तसेच पोस्टमध्ये 4.8 लाख रुपये किंमतही दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शाओमीच्या या स्पेशल व्हेरिअंटबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
 
हे दोन्ही फोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. रेडमी के 20 प्रोमध्ये 6.39 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि अँड्रॉईड 9 पाय सिस्टम यामध्ये आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा (48MP+13MP+8MP)  सेटअप आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला असून 8 जीबी रॅमही दिली आहे.
 
दोन्ही फोनमध्ये 4000mAh बॅटरी क्षमता दिलेली आहे. रेडमी के 20 च्या स्पेसिफिकेशन आणि डिझाईन प्रो व्हेरिअंट प्रमाणे  आहेत. पण प्रोसेसर, रॅममध्ये बदल आहे. रेडमी के 20 मध्ये स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरसह 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. तसेच या फोनची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

Monsoon rain warning महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी

LIVE: शिंदे यांनी घोषणा केली, शिवसेना आणखी मजबूतपणे विस्तारणार

लखनौमध्ये मोठी दुर्घटना, कोचिंग-कम-गेमिंग झोनमध्ये भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू

व्हॉट्सॲप दोन प्रमुख फीचर्स येणार, ऑनलाइन वापरकर्त्यांना ओळखणे आणि बॅकअप व्यवस्थापित करणे सोपे होणार

जनतेची माफी मागणार अन् बंडखोरांना भिडणार! उद्धव ठाकरेंचा ३ दिवसांचा झंझावाती दौरा

पुढील लेख
Show comments