Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज Xiaomi च्या ‘बजेट’फोनचा‘सेल’

Webdunia
मंगळवार, 16 जून 2020 (11:58 IST)
Xiaomiचा शानदार बजेट स्मार्टफोन Redmi Note 9 Pro साठी आज(दि.१६) पुन्हा एकदा फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. मार्च महिन्यामध्ये लाँच झाल्यापासून तीन महिने उलटले, तरीही हा फोन अद्याप फ्लॅश सेलमध्येच उपलब्ध होत आहे.  Mi.कॉम आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर हा सेल सुरू होत असून या फोनच्या खरेदीवर सेलमध्ये आकर्षक ऑफरही आहे.  Redmi Note 9 Pro भारतीय बाजारात आज दुपारी 12 वाजेपासून सेलमध्ये उपलब्ध असेल.  कंपनीने मार्चमध्ये Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max हे दोन फोन लाँच केले होते. यातील  Redmi Note 9 Pro Max साठीही उद्या सेल असणार आहे.
 
 Redmi Note 9 Pro हा फोन सेलमध्ये खरेदी केल्यास एअरटेलच्या ग्राहकांना डबल डेटा बेनिफिटची ऑफर आहे.  298 आणि 398 रुपयांच्या प्लॅनवर ही ऑफर मिळेल. पण, करोना व्हायरस संकटामुळे कंपनीकडून एक्सचेंज ऑफर दिली जात नाहीये. या फोनमध्ये मागील बाजूला 48MP प्रायमरी सेन्सरसह चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
 
रेडमी नोट 9 प्रो स्पेसिफिकेशन्स : दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे.
 
याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे. 
 
रेडमी नोट 9 प्रो मॅक्सप्रमाणे या फोनमध्येही NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे.
 
किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments