Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युद्धात हात गमावलेल्या हंगेरीच्या शूटरकडून प्रेरणा घेत सरबजोत सिंहने जिंकलं कांस्य पदक

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (16:47 IST)
अंबालातील धीन गावातून आलेल्या नेमबाज सरबजोत सिंग याने मनु भाकेरच्या सोबतीने मंगळवारी (30 जुलै) इतिहास रचला. दोघांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.तिसऱ्या स्थानासाठी अतिशय चुरशीच्या लढतीत या भारतीय जोडीनं दक्षिण कोरियाच्या संघाला धोबीपछाड देत कांस्यपदकाला गवसणी घातली.
 
प्रशिक्षक अभिषेक राणा यांनी आनंद व्यक्त करत हंगेरीचा नेमबाज कारोलाय टकास हा सरबजोतचं प्रेरणास्थान असल्याचं सांगितलं. संदीप माहेश्वरींनी सांगितलेली कारोलायची गोष्ट ऐकल्यानंतर सरबजोतचं आयुष्य बदलल्याचं राणा म्हणाले.

“सैन्यात असताना एका बॉम्ब स्फोट ‍अपघातात नेमबाज असलेल्या कारोलायने आपला उजवा हातच गमावला. उजवा असलेल्या कारोलायने मग डाव्या हाताने नेमबाजी शिकत पुढच्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं. कारोलायचा हा संघर्ष माझ्यासाठी प्रेरणा बनला. लाखो अडथळे आले तरी जिद्दीच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता, हा विश्वास दिला. प्रशिक्षणादरम्यान मी सातत्यानं सरबजोतजवळ कारोलायचा उल्लेख करायचो.
 
कारोलायचा संघर्ष माझ्याप्रमाणेच सरबजोतसाठी देखील एक प्रेरणास्थान बनला. तो आणखी लक्षपूर्वक आणि समर्पित होऊन तयारी करू लागला. ऑलिम्पिक पदक हेच आम्हा दोघांचं एकमेव ध्येय बनलं होतं,” पत्रकारांशी बोलताना प्रशिक्षक अभिषेक राणा यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे झळकत होतं.
2016 साली सरबजोतनी अंबालामधील अभिषेक चालवत असलेल्या नेमबाजी अकादमीत प्रवेश घेतला. पुढच्याच वर्षी 2017 ला ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सरबजोतने कांस्यपदक पटकावलं.
 
“यानंतर सरबजोतने कधी मागे वळून पाहिलं नाही. राष्ट्रीय पातळीवर सरबजोतचं नाव होऊ लागलं. एकामागोमाग एक स्पर्धा जिंकत सरबजोतनं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्याची मेहनत आणि सकारात्मक मानसिकता ही या यशाची गुरुकिल्ली आहे,” असं अभिषेक सांगतात.
अभिषेक राणा स्वतः राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज राहिलेले आहेत. कुरुक्षेत्र गुरूकुलमध्ये शिकत असतानाच त्यांना नेमबाजीची आवड लागली.
 
अभिषेक सांगतात की, “गुरूकुलमध्ये असल्यामुळे आधीपासूनच कठोर शिस्त आम्हाला लावली गेली. आजच्या डिजीटल युगात लक्ष विचलीत करणाऱ्या कुठल्याही अनावश्यक गोष्टींपासून मी स्वतः दूर राहतो आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही तेच सांगत असतो. ही शिस्त माझ्या प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग आहे.
 
मला आठवतंय मध्यंतरी सरबजोतसुद्धा मोबाईलमध्ये बराच काळ वेळ घालवत असे. तासनतास तो ॲपवर गेम खेळायचा‌. त्याच्या आई - वडिलांनी ही गोष्ट माझ्या नजरेस आणून दिली. तेव्हा मी स्वतः त्याच्या फोनमधलं हे ॲपच उडवून लावत त्याला धारेवर धरलं होतं. फक्त नेमबाजीवर लक्ष्य केंद्रित करणं त्याला भाग होतं.”
स्वतः नेमबाज होऊन गेलेल्या अभिषेक राणा यांनी 2007 आणि 2009 साली कनिष्ठ भारतीय नेमबाजी संघात स्थान मिळवलं होतं. पण त्यानंतर हळूहळू त्यांच्या खेळाला उतरती कळा लागली.
 
2011 पर्यंत ते राष्ट्रीय संघातून बाहेर फेकले गेले. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर 2016 साली त्यांनी स्वतःची नेमबाजी अकादमी सुरू केली आणि ते प्रशिक्षक बनले.
“जे मी करू शकलो नाही ते माझ्या विद्यार्थ्यांनी करावं, अशी माझी इच्छा होती. माझं स्वप्न मी त्यांच्या मार्फत जगत होतो. सरबजोतने आज पदक जिंकून स्वतःचंच नव्हे तर माझंही स्वप्न पूर्ण केलेलं आहे. हा सरबजोत, मी आणि या प्रवासात त्याची साथ दिलेल्या प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे, अशा शब्दात अभिषेक यांनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली‌.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुंबईतील नालासोपारा रेल्वे स्थानकावर तिकीट मागितल्यावर टीसीला हॉकी स्टिकने मारहाण

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

नाना पटोलेंचा PM मोदींवर मोठा आरोप, म्हणाले- अमरावतीचे PM मित्रा पार्क गुजरातला नेणार

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105, 95, 88 चा फॉर्म्युला, MVA मधील जागांचे वाटप ठरले !

पुढील लेख
Show comments