आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) भारताच्या अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घातली आहे, ज्यामुळे तो मंगळवारी जर्मनीविरुद्ध होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. रविवारी ब्रिटनविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोहिदासला लाल कार्ड दाखवण्यात आले.भारतीय हॉकी संघाने ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
सामन्याच्या 17 व्या मिनिटाला रोहिदासची हॉकी स्टिक चुकून एका ब्रिटिश खेळाडूच्या डोक्यात लागली. मात्र रेफरीने त्याला जाणूनबुजून केलेले कृत्य मानले. आणि त्याला सामन्यातून बाहेर काढण्यात आले. भारतीय हॉकी संघाने 10 खेळाडूंसह सुमारे 42 मिनिटे खेळला आणि हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली पेनल्टी शूटआऊट मध्ये ब्रिटनचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.
4 ऑगस्ट रोजी भारत आणि ब्रिटन यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान FIH आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले.आता संघ अमित रोहिदास याच्या शिवाय 15 खेळाडूंसह खेळणार. एफआयएच सोमवारी या अपिलावर सुनावणी करून उत्तर दाखल करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.