आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला कोकिला व्रत आरंभ होते. हे व्रत श्रावण पौर्णिमेपर्यंत सुरु राहते. शास्त्रानुसार हे व्रत प्रथम देवी पार्वतीने शिव पती म्हणून मिळावा म्हणून केले होते. शास्त्रानुसार भगवान शिव यांचा विवाह दक्ष प्रजापतिची मुलगी सती यांच्यासोबत झाला होता. प्रजापति शिवाला पसंत करत नव्हते, म्हणून प्रजापतिने फार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले तेव्हा सर्व देवी-देवतांना बोलावले परंतु शिव आणि सतीला आमंत्रण दिले नाही. सतीच्या मनात पित्याचा यज्ञ बघण्याची इच्छा झाली म्हणून त्या शिवाकडे हट्ट करून यज्ञस्थळी पोहोचल्या.
त्यावेळी दक्षाने शिव आणि सतीचा फार अपमान केला. सती अपमान सहन करू शकली नाही आणि यज्ञ कुण्डात उडी मारून जळून गेली. यानंतर शिवाने दक्षचा यज्ञ नष्ट केला हट्ट करून प्रजापतिच्या यज्ञात सामील झाल्यामुळे सतीला शाप दिला की तिने दहा वर्षापर्यंत कोकिळा बनून नंदनवनात रहायचे.
कोकिळा व्रताच्या विषयात अशी मान्यता आहे कि ह्यामुळे सुयोग्य पतीची प्राप्ती होते. ज्या विवाहित स्त्रियां ह्या व्रताचे पालन करतील, त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. घरात वैभव आणि सुखाची भरभराट होते.
ह्या व्रतास सौन्दर्य प्रदान करणारे व्रत म्हणू्नही पाहिले जाते कारण ह्या व्रतात जडी-बूटी स्नानासाठी वापरण्याचा नियम आहे. या व्रतात दररोज कोकिळेची पूजा करण्याचा नियम आहे.