Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Kumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या ?

Kumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून घ्या ?
, मंगळवार, 15 जानेवारी 2019 (16:40 IST)
प्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. तीर्थराज प्रयागामध्ये संगमच्या तटावर हिंदू माघ महिन्यात कल्पावास करतात. मान्यता अशी आहे की प्रयागामध्ये सूर्याचे मकर राशीत प्रवेश केल्याबरोबर सुरू होणारे एक महिन्याच्या कल्पवासातून एक कल्प अर्थात ब्रह्माचे एक दिवसाचे पुण्य मिळतात. पौष पौर्णिमेपासून कल्पावास आरंभ होतो आणि माघी पौर्णिमेसोबतच त्याची समाप्ती होते.

कल्पवासात लोक संगमच्या तटावर डेरा जमवतात. पौष पौर्णिमेसोबतच सुरू करणारे श्रद्धालु एक महिन्यापर्यंत तिथेच असतात आणि भजन-ध्यान इत्यादी करतात. काही लोक मकर संक्रांतीपासून देखील कल्पावास आरंभ करतात. कल्पावास मनुष्यासाठी आध्यात्मिक विकासाचा माध्यम आहे.
 
कुंभ मेळ्याच्या संगम तटावर कल्पवासाचे खास महत्त्व आहे. कल्पवासाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये देखील मिळतो. कल्पावास एक फारच मुष्किल साधना आहे कारण यात बर्‍याच प्रकारचे नियंत्रण आणि संयमाचे अभ्यस्त होणे गरजेचे आहे. पद्म पुराणात महर्षी दत्तात्रेयाने कल्पवासच्या नियमांबद्दल सविस्तर सांगितले आहे.
 
त्यांच्यानुसार  कल्पवासी यांना एकवीस नियमांचे पालन करायला पाहिजे. हे नियम आहे – सत्यवचन, अहिंसा, इंद्रियांचे शमणं, सर्व प्राण्यांवर दयाभाव, ब्रह्मचर्याचे पालन, व्यसनांचा त्याग, सूर्योदयाअगोदर शैय्या-त्याग, नित्य तीन वेळा सुरसरि-स्नान, त्रिकालसंध्या, पितरांचे पिण्डदान, दान, जप, सत्संग, क्षेत्र संन्यास अर्थात संकल्पित क्षेत्राच्या बाहेर न जाणे, परनिंदा त्याग, साधू सन्यासिंची सेवा, जप आणि संकीर्तन, एक वेळेस भोजन, भूमी शयन, अग्नी सेवन न करणे. कल्पवासात सर्वात जास्त महत्त्व ब्रह्मचर्य, व्रत आणि उपवास, देव पूजन, सत्संग, दान यांचे आहे.
 
कल्पवासादरम्यान स्वच्छ श्वेत वस्त्र धारण करायला पाहिजे. पिवळे व पांढर्‍या रंगांचे वस्त्र श्रेष्ठकर असतात. या प्रकारे आचरण करून मनुष्य आपले अंतःकरण आणि शरीर दोघांचे कायाकल्प करू शकतो.
 
एक महिन्यापर्यंत चालणारे कल्पवासादरम्यान कल्पवासीला जमिनीवर झोपावे लागतात. या दरम्यान भाविक फलाहार, एका वेळेस आहार किंवा निराहार करतात. कल्पावास करणार्‍या व्यक्तीला नेमाने तीन वेळेस गंगा स्नान आणि यथासंभव भजन-कीर्तन, प्रभू चर्चा आणि प्रभू लीलेचे दर्शन करायला पाहिजे. कल्पवासाची सुरुवात केल्यानंतर याला 12 वर्षांपर्यंत सुरू ठेवण्याची प्रथा आहे. यापेक्षा जास्त वेळ देखील ठेवू शकता.
 
कल्पवासाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी तुळशी आणि शालिग्रामाची स्थापना आणि पूजा केली जाते. कल्पवासी आपल्या टेंटच्या बाहेर 'जौ'च्या बियांचे रोपण करतो.
 
कल्पवासाच्या समाप्तीवर या पौध्याला कल्पवासी आपल्या सोबत घेऊन जातात. जेव्हा की तुळशीला गंगेत प्रवाहित करण्यात येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देव तिळी आला