SI म्हणजे सब इन्स्पेक्टर चे पद भारत सरकारची एक महत्त्वाची आणि जबाबदारीचे पद आहे. असे बरेच विद्यार्थी असतात जे या परीक्षेसाठी खूप परिश्रम करतात पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावी SI परीक्षेत यश मिळवण्यात अपयशी ठरतात. आपण देखील या परीक्षेला देण्याचा विचार करीत असाल तर आज आम्ही ह्याच्या संदर्भात काही माहिती देत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.
सब इन्सपेक्टर च्या नोकरीत चांगल्या पगारासह सन्मान देखील मिळतो. जर कठोर परिश्रम करून देखील आपणास यश मिळत नाही तर ह्याचा अर्थ असा नाही की आपण SI बनण्याचे स्वप्न सोडून द्यावे. तर या गोष्टीचा शोध लावावा की चुका कुठे होत आहे. कोणत्याही परीक्षेला उत्तीर्ण करण्यासाठी उत्कंठता असावी लागते तरच त्यामध्ये यश मिळतो.
जर आपण या परीक्षेसाठी योग्य रणनीती आणि कठोर परिश्रम करत असाल तरच आपण या मध्ये यश संपादन करू शकाल. या साठी आपल्याला या SI च्या परीक्षे साठी पात्रता, शारीरिक आवश्यकता, तसेच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे नमुने काय आहे हे सर्व माहीत असावे. जेणे करून आपल्याला काही समस्या उद्भवू नयेत.
* सब इन्सपेक्टर च्या परीक्षेसाठी तयारी कशी करावी -
जर आपण SI च्या परीक्षेची तयारी करीत आहात आणि या मध्ये पुन्हा-पुन्हा अपयशी ठरत आहात तर आपल्याला निराश होण्याची आवश्यकता नाही. तर आपल्याला हे शोधायचे आहे की अपयशाचे नेमके कारण कोणते. एवढे परिश्रम करून देखील यश का मिळत नाही तर कदाचित आपल्याला ह्याची तयारी कशी करावी हेच माहीत नसावे. जसे की परीक्षेचा अभ्यासक्रम, नंतर घेतल्या जाणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल ची माहिती नसावी. कारण आपण जो पर्यंत योग्य रणनीती बनवत नाही तो पर्यंत ही नोकरी मिळवणे कठीण आहे. या साठी बाजारपेठेत अशी अनेक कोचिंग सेंटर आहेत जी सब इन्स्पेक्टर साठी योग्य मार्गदर्शन देतात. जिथून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळू शकतो.
* सब इन्सपेक्टर चे कार्य काय असतात
एका सब इन्सपेक्टर चे काम काही पोलीस कर्मचाऱ्यांना जसे की हेड कॉन्स्टेबल, पोलीस चौकींना आदेश देणे असते. या मध्ये सुरुवातीला निम्न रँकचे अधिकारी असतात जे भारतीय पोलीस खात्याच्या नियमानुसार न्यायालयात खटला दाखल करू शकतात. हे आधी अन्वेषण अधिकारी असतात.सब इन्सपेक्टर च्या अंतर्गत कोणता ही अधिकारी आरोपपत्र दाखल करू शकत नाही. परंतु त्याच्या वतीने खटल्याची चौकशी करू शकतात. चला तर मग या या साठी पात्रता काय असावी ते सांगत आहोत जाणून घ्या.
* सब इन्स्पेक्टर कसे बनावे पात्रता काय असावी -
या परीक्षे मध्ये बसण्यासाठी सर्वप्रथम त्यांना राज्य सरकारद्वारे घेण्यात येणाऱ्या सब इन्सपेक्टरच्या भरती साठी अर्ज करावे लागेल. तरच ते SI च्या परीक्षेत भाग घेऊ शकतात. या साठी उमेदवाराला सब इन्सपेक्टर साठी खालील दिलेली पात्रता असणे आवश्यक आहे.
या परीक्षेत भाग घेण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच उमेदवार एस आई च्या परीक्षेत भाग घेऊ शकतात. जर आपण कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवी घेतली नसेल तर आपण ह्या परीक्षेत सहभागी होऊ शकत नाही.
* सब इन्स्पेक्टरच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा -
या परीक्षेत भाग घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय वर्षे 28 असणे आवश्यक आहे.
एससी / एसटी उमेदवार वयोमर्यादा - सब इन्स्पेक्टर परीक्षेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वयोगटातील उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.ओबीसी उमेदवार वयोमर्यादा - सब इन्स्पेक्टर परीक्षेत ओबीसी उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
* सब इन्सपेक्टर परीक्षेसाठीचे अभ्यासक्रम -
SI च्या परीक्षेत भाग घेण्यापूर्वी या परीक्षेचे अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना बद्दल ची माहिती असावी कारण या अभ्यासक्रमावर आधारे प्रश्नच परीक्षेत विचारले जातात आणि या अभ्यासक्रमाच्या आधारेच सब इन्सपेक्टर परीक्षे ची तयारी करावयाची असते.
आपल्याला SI चे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अभ्यासक्रमाची माहिती मिळवायची असेल तर आम्ही देत आहोत जाणून घ्या.
* टेक्निकल किंवा तांत्रिक साठी -
या मध्ये 100 गुणांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना सोडविण्यासाठी 2 तासाचा वेळ देण्यात येतो आणि या मध्ये कोणत्याही प्रकाराची निगेटिव्ह मार्किंग केली जात नाही.
भौतिकशास्त्र - 33 गुण
रसायनशास्त्र - 33 गुण
गणित - 34 गुण
* नॉन टेक्निकल किंवा विना तांत्रिक-
या मध्ये 200 गुणांकाचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाते ज्यांना सोडविण्यासाठी 3 तासाचा वेळ देण्यात येतो आणि या मध्ये कोणत्याही प्रकाराची निगेटिव्ह मार्किंग केली जात नाही.
हिंदी - 70 गुण
इंग्रजी - 30 गुण
सामान्य ज्ञान - 100 गुण
* सब इन्स्पेक्टर लेखी परीक्षा -
सर्वप्रथम उमेदवाराला SI ची परीक्षा देण्यासाठी बोलविले जाते आणि उमेदवाराने लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पुढील प्रक्रियेसाठी बोलवतात.
* कागद्पत्रक तपासणी -
जेव्हा उमेदवार सब इन्सपेक्टर ची परीक्षा उत्तीर्ण करतात त्या नंतर उमेदवाराला कागदपत्रे पडताळणी करण्यास बोलवतात.
* शारीरिक कार्यक्षमता चाचणी -
कागदपत्रे पडताळणी केल्यावर उमेदवाराला शारीरिक कार्यक्षमता चाचणी साठी बोलविले जाते.जे उमेदवार या चाचणीत उत्तीर्ण होतात त्यांना सब इन्सपेक्टर च्या ट्रेनिंग साठी पाठविले जाते. प्रत्येक राज्यात स्त्री आणि पुरुषांसाठी कार्य क्षमता वेगळी असते.
पुरुष उमेदवारांसाठी -
उंची - 167.5 सेमी
छाती - 81-86 सेमी
महिला उमेदवारांसाठी
उंची - 152.4 सेमी
छाती - एन / ए
* सब इन्सपेक्टर चा पगार किती असतो ?
प्रत्येक राज्यात सब इन्सपेक्टर चा पगार वेग वेगळा असतो भारतात सब इन्सपेक्टर चा सरासरी पगार सर्व भत्ते मिळून सुमारे दरमहा 42,055 रुपये असतो.