Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खेळता खेळता 4 वर्षीय चिमुकल्याचा कोंढव्यात दुर्देवी अंत

4 year old Chimukalya's unfortunate end in Kondhwa while playing खेळता खेळता 4 वर्षीय चिमुकल्याचा कोंढव्यात दुर्देवी अंतMarathi Pune News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 4 मार्च 2022 (18:30 IST)
पुण्यातील कोंढवा परिसरातून हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळता खेळता 4 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला आहे. शहजाद अमीर सय्यद असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. कोंढवा परिसरातील गल्ली क्रमांक 10 येथे हा चिमुकला आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी शहजाद आपल्या मित्रांसह रस्त्यावर खेळत असताना रस्त्याच्या बाजूने बांधकाम सुरु होते. त्याबाजूला एक विद्युत वाहक ट्रान्स्फार्मर देखील उघडे ठेवण्यात आले होते. 
 
या चिमुकल्याने खेळता खेळता जाऊन या वीजवाहक ट्रान्स्फार्मरच्या आत हात टाकला असता त्याला विजेचा जोरदार शॉक लागून त्याचा जागीच अंत झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा चिमुकला त्या ट्रान्स्फार्मर मध्ये हात घालताना दिसत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
रस्त्यावर खोदकाम करणारा ठेकेदार आणि महावितरणच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.  या प्रकरणावर बोलताना महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की ''या प्रकरणी उत्खननासाठी कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महावितरणकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. हे उत्खनन काम महावितरणच्या परवानगी शिवाय करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि महावितरणच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल: या स्मार्टफोन्सवर 4,000 रुपयांपर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर