Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
, मंगळवार, 30 मार्च 2021 (10:13 IST)
वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या घटनेमुळे पुणे हादरले असून बलात्कार झाल्याच्या 15 दिवसानंतर ही घटना समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केल्यानंतर, चौकशीत 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला.
 
याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी यातील 5 जणांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
या घटनेतील आरोपी श्रीकांत काळे याला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केेेली होती. त्यावेळी बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. 15 दिवसांपूर्वी आरोपींनी पीडित मुलीला वाढदिवसासाठी बोलावलं होतं. वाढदिवसानिमित्त पार्टी असल्याचं सांगून 14 वर्षीय मुलीला बोलावलं. यावेळी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. नराधम यावरच थांबले नाहीत, त्यांनी आणखी दोन मित्रांना तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे असल्याचे सांगितले. पीडितेने या सर्वप्रकाराला विरोध केल्यानंतर, आरोपींनी चक्क गोळीबार केला. जनता वसाहतीत राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 5 जणांना ताब्यात घेऊन, त्यापैकी दोघांना अटक केली आहे. कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय २४, रा.), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय २०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रकांत पाटील यांचे भावनिक ट्विट, म्हणाले शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावेत