Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबूराव चांदेरे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल,अजित पवारांनी दिले हे आदेश

Webdunia
सोमवार, 27 जानेवारी 2025 (16:40 IST)
ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बाबुराव चांदेरे यांच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत चांदेरे यांना सज्जड दम दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुसगाव येथे बाबूराव चांदेरे यांनी पोकलेन लावून खोदकाम चालवले होते.या वेळी तक्रारदार प्रशांत जाधव यांनी चांदेरे यांना बांधकामाबाबत विचारणा केली असता तू कोण विचारणारा? असे म्हणत जाधव यांचा कानशिलात लगावली. आणि चांदेरे सोबत असलेल्या व्यक्तींनी जाधव यांना धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बावधन पोलिसांनी तक्रारदार प्रशांत जाधव यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणालाही कायदा हातात घेण्याच्या अधिकार नाही.अशा वागणुकीला पक्षात स्थान नाही. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, मारहाणीची क्लिप पाहून मला खूप वाईट वाटले.
ALSO READ: पुण्यात वाढले गुलियन-बॅरे चे रुग्ण, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली मोठी घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबुराव चांदेरे यांना फोन करून विचारणा केली, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मग मी त्याच्या मुलाशी बोललो. मी अशा कोणत्याही कृतीचे समर्थन करणार नाही. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल.

बाबुराव चांदेरे हे यापूर्वीही वादग्रस्त वर्तनात अडकले आहेत. काही महिन्यांपूर्वी रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. यानंतर असाच एक व्हिडिओ पुन्हा समोर आल्यानंतर चांदेरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अजित पवार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चांदेरे यांना पक्षांतर्गत चर्चेत सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे पक्षाची प्रतिमा डागाळू नये यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे संकेत दिले आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

ऑपरेशन सिंदूरमध्ये पुराव्यांसह पाकिस्तानचा पर्दाफाश करणारी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी कोण आहे

ऑपरेशन सिंदूर: रात्री 1:05 वाजता हल्ला, 25 मिनिटांत 21 लपण्याची ठिकाणे उद्ध्वस्त आणि नंतर..

ऑपरेशन सिंदूर: भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, 24 क्षेपणास्त्रांनी 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, 100 हून अधिक दहशतवादी ठार

ऑपरेशन सिंदूरपूर्वी भारतीय लष्कराचे संस्कृत ट्विट: "प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिता:", अर्थ जाणून घ्या

पुढील लेख
Show comments