Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूपीएससीच्या परीक्षेत देशात तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या पुण्याच्या अर्चित डोंगरे बद्दल जाणून घ्या

archit dongre
, बुधवार, 23 एप्रिल 2025 (14:12 IST)
यूपीएससीने काल निकाल जाहीर केला या मध्ये देशात तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पुण्याच्या अर्चित डोंगरे याने पटकवला आहे. पुण्याचा रहिवासी असलेला अर्चित यांने तामिळनाडूच्या व्हीआयटी व्हेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनियरिंग केले आहे 

त्याने शालेय शिक्षण मुंबईतून घेतले असून बारावी पर्यंतचे शिक्षणपुण्यातून पूर्ण केले. त्यांनतर वेल्लोरहून इंजिनियरिंगची पदवी घेतल्यावर 11 महिने एका आयटी कंपनीत काम केले. नंतर नौकरी सोडली आणि यूपीएससीची तयारी सुरु केली. त्याने 2023 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली त्यात त्याचा 153 वा क्रमांक आला.
मात्र यंदाच्या परीक्षेत जरी यूपीएससीने राज्यनिकाय यादी जाहीर केलेली नाही तरीही अर्चित ला महाराष्ट्रातून सर्वाधिक रँक असून त्याने देशातून तिसरा क्रमांक पटकावला असून महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. 
 
अर्चित डोंगरे यांनी 2023 च्या यूपीएससी परीक्षेत 153 वा क्रमांक मिळवला होता आणि सध्या ते आयपीएस अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. यावेळी त्याने पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षेत भाग घेतला आणि देशात तिसरा क्रमांक मिळवला, समर्पण आणि दृढनिश्चयाने कोणतेही ध्येय साध्य करता येते हे सिद्ध करून दिले. 
 
यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर झालेल्या निकालांमध्ये एकूण 1009 उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये 335 सामान्य श्रेणी, 109ईडब्ल्यूएस, 318 ओबीसी, 160 अनुसूचित जाती आणि 87 अनुसूचित जमाती श्रेणीतील उमेदवारांचा समावेश आहे. या वर्षी यूपीएससीने एकूण 1132 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली, ज्यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस सारख्या प्रतिष्ठित सेवांचा समावेश आहे.
2024 च्या परीक्षेसाठी यूपीएससीने आयएएस, आयपीएस आणि भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) यासह एकूण 1132 पदांसाठी भरती जाहीर केली होती.

हा निकाल महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाची बाब ठरला आहे. पुण्याच्या अर्चित डोंगरे यांनी देशात तिसरा क्रमांक मिळवून राज्याचे नाव उंचावले आहे. याशिवाय ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा आणि अंकिता पाटील हिने 303 वा क्रमांक मिळवला आहे.
 
 Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात काहीच गैर नाही', अजित पवारांसोबतच्या भेटी आणि अटकळांवर म्हणाले शरद पवार