Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई जवळपास ४५ लाख दंड वसूल

About Rs 45 lakh fine for non-use of masks मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई जवळपास ४५ लाख दंड वसूलMarathi Pune News  In Webdunia Marathi
, सोमवार, 17 जानेवारी 2022 (08:34 IST)
कोविडपासून बचावासाठी मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ९ हजार २७० कारवाईत ४५ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागामार्फत मुखपट्टी वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. महापालिका आणि नगर पालिकेतर्फेदेखील दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले.
बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, भीमराव तापकीर, राहूल कुल, सुनिल कांबळे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. भारतीय जैन संघटना संस्थेच्या शांतीलाल मुथा यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या कोविडमुक्त गाव अभियानाची माहिती दिली. हे अभियान प्रत्येक गावात राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉलर वाल्या वाघिणीने अखेरचा श्वास घेतला, एकाच वेळी 5 शावकांसह 29 मुलांना जन्म देऊन विश्वविक्रम केला