Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

.पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेली आग विझवून घरी परतताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

.पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेली आग विझवून घरी परतताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
, शनिवार, 27 मार्च 2021 (16:37 IST)
पुण्याच्या फॅशन स्ट्रिट मार्केटमध्ये लागलेली आग ‌विझवून झाल्यानंतर घरी परतत असलेल्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. येरवड्याजवळ हा अपघात झाला. अपघातात जागीच त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश हसबे असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे प्रमुख होते.
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग मध्यरात्री 1 च्या सुमारास पूर्णपणे आटोक्यात आली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन झाल्यानंतर प्रकाश हसबे हे घरी जाण्यास निघाले. पहाटे घरी जात असताना येरवाड्याजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल तीन तासांनी ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना निर्बंध झुगारत भावी PSIचे सेलिब्रेशन, व्हिडिओ व्हायरल