पुण्यातील धनकवडी येथे आयुर्वेदिक मसाज सेंटर चालवणाऱ्या महिलेला धमकावून पैसे उकळण्याचा आरोपाखाली सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आरोपी आपल्या मित्रांसोबत मसाज करणवण्यासाठी मसाज पार्लर मध्ये गेला होता त्याने दरम्यान शर्टच्या खिशात मोबाइलफोन रेकॉर्डिंग ठेवले होते. आरोपीने महिलेशी मसाज करताना तिचा टॉप काढण्यासाठी दबाब आणला तिने नकार दिल्यावर मसाज पार्लर बंद करण्याची धमकी दिली. नंतर त्याने आपल्या दोन साथीदारांना बोलावून महिलेकडून 20 हजार रुपये देण्याची मागणी केली. तिने पैसे न दिल्यास तिचा व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली.
महिलेने पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आणि आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.