पुण्यात कामाच्या तणावामुळे एका 26 वर्षाच्या सीए चा दुर्देवी मृत्यू झाला. संदर्भ देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त केली.या प्रकारणांनंतर मोदी सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तर या घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना केली व्यक्त केली आहे.
अजित पवारांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर सांगितले की कामाच्या तणावामुळे महिला कर्मचारीचा मृत्यूची बातमी ऐकल्याने दुःख झाले. कामाच्या किंवा कुठल्याही तणावामुळे वाढणाऱ्या मृत्यूच्या घटनांवर लक्ष देण्याची गरज आहे. EVE सुधारात्मक पावले उचलेल अशी मी आशा बाळगतो.
ॲना सेबॅस्टियन पेरायल यांनी सन 2023 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यांनी चार महिने ईवाय पुणे कार्यालयात काम केले आणि नुकतीच आत्महत्या केली. त्याच्या आईने EY इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमाणी यांना पत्र लिहून फर्ममधील कामाच्या अतिभाराकडे लक्ष वेधले होते.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की ते कथित "असुरक्षित आणि शोषणात्मक कामाच्या वातावरणाची" चौकशी करत आहेत. आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहोत. कामगार मंत्रालयाने या प्रकरणी अधिकृतपणे तक्रार नोंदवून घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार विभागाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली आहे.
EY ने बुधवारी एक निवेदन जारी केले की जुलै 2024 मध्ये ॲना सेबॅस्टियनच्या दुःखद आणि अकाली मृत्यूमुळे खूप दुःख झाले आहे. कामाच्या स्वरूपात सुधारणा करणार असून कार्यालयाचे वातावरण निरोगी ठेवण्यात येईल असे म्हणाले.