पुण्यात महानगरपालिके तर्फे नेदरलॅन्ड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजेतील प्रभाग 30 मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पणाच्या कार्य्रक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या वेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध झाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रिया सुळे यांचे भाषण झाले त्यात त्यांनी या ठिकाणी नगरसेवक नसल्याचे म्हटले. तसेच सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं या साठी महापालिका निवडणूक लवकर घेण्याचे म्हटले.
या नंतर अजित पवार यांचे भाषण झाले या भाषणात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानावर भाष्य केलं. ते म्हणाले दोन वर्षांपासून महानगरपालिका निवडणूक थांबलेल्या आहे . या निवडणूक सुप्रीम कोर्टामुळे थांबला आहे. सुप्रीम कोर्टात ओबीसींचा मुद्दा गेला आहे त्यावर लवकरात लवकर तारीख लागण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. महापालिका निवडणुका लवकर व्हाव्या या मतांचं हे राज्य सरकार आहे..
गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी हे शासन संवेदनशील असून त्यासाठी योग्य निर्णय घेत आहे. सामान्य माणसांसाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी कल्पना आली. या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये 10 टक्के खाटा मोफत आणि 6 टक्के खाटा शासकीय दरानं देण्याचा निर्णय घेतला आहे. हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पटिल उत्तम सुविधा असलेलं असून सामान्य नागरिकांसाठी उभारणार आहे. बाणेर मध्ये देखील 550 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.