Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र दोरड्यातील टोली गजाआड; पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.36 कोटींचा मुद्देमाल जप्त

पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र दोरड्यातील टोली गजाआड; पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.36 कोटींचा मुद्देमाल जप्त
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (22:25 IST)
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 21 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास 5 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपींनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व हजर असलेल्या ग्राहकांना पिस्तुलाचा (pistol) धाक दाखवून बँकेतील 32 लाख 52 हजार 560 रुपयांची रोकड आणि 2 कोटी 47 लाख 20 हजार 390 रुपये किंमतीचे 824 तोळे सोने असा एकूण 2 कोटी 79 लाख 72 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्यातील आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली (Pune Crime) होती.
 
डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हळ (वय-29 रा. वाळद, ता. खेड), अंकुश महादेव पाबळे (वय-24 रा. कावळपिंपरी, ता. जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (वय-29 रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. नगर), आदिनाथ मच्छिंद्र पठारे (वय-25 रा. पठारवाडी, ता. पारनेर), विकास सुरेश गुंजाळ (वय-20 रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. डॉलर उर्फ प्रविण ओव्हाळ हा टोळी प्रमुख असून त्याला पारनेर तालुक्यातील निघोज येथून अटक केली. आरोपींकडून 2 कोटी 19 लाख 15 हजार 370 रुपये किंमतीचे 7 किलो 32 तोळे दागिने (Jewelry) आणि 18 लाख 27 हजार 590 रुपये रोख (Cash) असा एकूण 2 कोटी 36 लाख 42 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.
 
दरोड्याचे 3 महिन्यापासून प्लॅनिंग
आरोपींनी बँकेवर दरोडा (Bank robbery case) टाकण्यासाठी तीन महिन्यांपासून पुर्वतयारी केली होती. त्यासाठी टोळी प्रमुख ओव्हाळ याने मध्यप्रदेशातून तीन पिस्टल आणल्या होत्या. तसेच गुन्हा करण्यासाठी दोन वाहनांचा वापर करण्यात आला. त्यापैकी मॅटेलीक ग्रे रंगाची सियाज कार (एमएच 05 सीएम 1293) गुन्ह्यात वापरण्यासाठी तिचा रंग पांढरा करुन घेतला. गुन्हा केल्यानंतर पुन्हा रंग बदल्यासाठी मध्यप्रदेश येथे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सियाज गाडीमधील मुद्देमाल बोलेनो (एमएच 14 एसएम 0707) मध्ये टाकून लंपास (Pune Crime) केला.
 
ओळख लपवण्यासाठी एक सारखे कपडे
आरोपींनी आपली ओळख लपून रहवी यासाठी गुन्हा करण्यापूर्वी एकाच प्रकारची जॅकेट, शुज, ट्रॅक पॅन्ट, हॅण्डग्लोव्हज, मास्क असे कपडे खरेदी केले होते. दरोडा टाकल्यानंतर हे सर्व कपडे जाळून टाकण्यात आले.
 
हा गुन्हा गंभीर असल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया (Special Inspector General of Police Manoj Lohia), पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (Sub-Divisional Police Officer Rahul Dhas) यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा, शिरुर व दौंड विभागाची पाच पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चुकीच्या वैद्यकीय सेवेने मुलीचा मृत्यू;कुतवळ हॉस्पिटलचा परवाना रद्द