Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, संग्राम थोपटे यांचा भाजप मध्ये प्रवेश

Webdunia
सोमवार, 21 एप्रिल 2025 (12:19 IST)
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि तीन वेळा पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून माजी आमदार राहिलेले संग्राम थोपटे यांनी त्यांच्या समर्थकांसह झालेल्या बैठकी नंतर काँग्रेसीतून राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. 
ALSO READ: मराठी भाषेचे नुकसान झालेले सहन केले जाणार नाही,सुप्रिया सुळे संतापल्या
परिसराच्या विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देश्याने त्यांनी हे पाऊल घेतले आहे. सत्तेत आल्याशिवाय प्रदेशातील विकासाचा वेग वाढवणे अशक्य असल्याचे त्यांच्या समर्थकांना सतत वाटायचे असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस मध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत  त्यांनी शनिवारी प्रदेश काँग्रेसाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सदर केला. 
 
थोपटे हे 22 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे ज्येष्ठनेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पक्षात प्रवेश करतील. 
ALSO READ: चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री 'चितळे स्वीट होम'वर गुन्हा दाखल
पत्रकाराशी बोलताना त्यांनी  काँग्रेसमध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आणि सांगितले की 2019 पासून त्यांना एकटेपणा जाणवत होता गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्याचे आवाहन केले होते, परंतु त्यांच्या मतदारसंघात कोणीही गेले नाही. निवडणूक हरल्यानंतर, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने मला एकदाही फोन केला नाही.
ALSO READ: तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
संग्राम थोपटे यांचे कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहे. ते ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत, ज्यांनी भोरमधून सहा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. पण आता राजकारणाचे हे जुने नाते तोडून संग्राम थोपटे भाजपकडे वळले आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

राज्यातील गरिबांना मिळणार नवीन घरे, नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर, कोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

मुंबईत ५३ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली, बीएमसीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

LIVE: मुंबईत ५३ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली, बीएमसीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

कलियुगातील आईचे क्रूर कृत्य, प्रियकराकडून अडीच वर्षांच्या मुलीवर दुष्कर्म केल्यानंतर हत्या

महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, आता CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज उपलब्ध होणार

पुढील लेख
Show comments