Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात SUV कारच्या बॉनेटवर बसून लग्नासाठी वधू निघाली,व्हिडीओ वायरल झाल्यावर 4 जणांवर गुन्हा दाखल

Bride leaves for wedding on SUV bonnet in Pune
, बुधवार, 14 जुलै 2021 (10:42 IST)
पुणे पोलिसांनी 23 वर्षीय वधू आणि काही इतरांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही महिला आपल्या विवाहसोहळ्याच्या ठिकाणी जात असताना चालत्या एसयूव्हीच्या बॉनेटवर बसली होती आणि तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मंगळवारी पुणे पोलिसांनी ही माहिती दिली.
 
 
लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गाडी सासवडकडे जात होती, जिथे विवाह सोहळा पार पडणार होता, सकाळी पुणे-सासवड रस्त्यावर दिवे घाटाकडे जात असताना व्हिडिओ शूट करण्यात आला.
 
 
अधिकाऱ्याने सांगितले की ही महिला चालत्या वाहनाच्या बॉनेटवर बसली असताना मोटारसायकलवरील एक माणूस व्हिडिओ बनवत होता.आम्ही वाहन, वाहन चालकांसह वाहनमधील इतर लोकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र कोविड रेग्युलेशन अ‍ॅक्ट इत्यादी अंतर्गत मोटार वाहन अधिनियम आणि आयपीसीच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी कुणीही मास्क लावलेला नव्हता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानमध्ये 15 जवानांचा मृत्यू