पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2016 मधील एका प्रकरणात त्यांच्याविरोधात मोफाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते जामीनासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये अखेर त्यांना जामीन मिळाला.
डीएसके कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती, आणि फ्लॅटबा ताबा दिला गेला नव्हता. या सर्व घटनेत कुलकर्णींना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी 2018 पासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
डीएसके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 450च्या पुढे आहे.त्याविषयी सुनावणी सुरू असल्याने कुलकर्णी दांपत्य तुरुंगाबाहेर येणार किंवा नाही, हा प्रश्न आहे.