केंद्रिय समितीने सोमवारी दिवसभर पुण्यातील कंटेनमेंट झोनची पाहाणी केली असून काही नवीन उपाययोजना महापालिकेला सुचवल्या आहेत.
- कम्युनिटी पार्टिसिपेशन वाढवा, लोकांचा प्रतिसाद वेगाने मिळावा
- कोरोनातून बरे झालेल्या लोकांना संरक्षण द्या, त्यांना प्रमोट करा
- खाजगी रूग्णालयातील बेडसची उपलब्धता पारदर्शी हवी
- रूग्णांना भटकावू लागू नये, बेडसाठी शोधाशोध करावी लागू नये यासाठी सतत मॉनिटरिंग करावं
- प्रकरणाचे गंभीर विश्लेषण करावे, ॲम्ब्युलंस ते उपचार मिळेपर्यंत वेळेच्या नोंदी घेऊन सुधारणा करणारी यंत्रणा उभी करा
पुण्यात सोमवारी दिवसभरात 181 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि 166 रुग्णांना डिस्चार्ज मिळाले. 13 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 8062 असून सक्रिय रुग्ण संख्या 2486 आहे. येथील एकूण मृत्यू संख्या 391 आहे तर आजपर्यंतच एकूण 5185 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.