Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; दहशतवाद्यांना सीरियातून सूचना

arrest
, गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (07:37 IST)
पुण्यात दहशतवाद्यांचा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. यासाठी त्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा कट हा उधळून लावण्यात आला आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याच्या तपासातून ही माहिती मिळाली आहे.
 
राष्ट्रीय तपास यंत्रणनेने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला काही दिवसंपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. या दहशतवाद्याचा संबंध हा पुणे इसिस मॉड्युल प्रकरणा असल्याचे देखील उघड झाले आहे.
 
पुण्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संपर्कात शाहनवाझ आलम होता. पुणे पोलिसांनी कोथरूड येथे १९ जुलैला महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरतांना अटक केली होती. मात्र, त्यांनी दिलेल्या माहितीवरून संशय बाळवल्याने त्यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. यावेळी कोंढवा येथून शहानवाझ हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
 
या आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये देखील बॉम्ब हल्ले करण्याची योजना आखली होती. हे सर्व आरोपी पुण्यात कोंढवा येथे राहत होते. ते ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ‘सुफा’ या उपसंघटनेशी संबंधित होते. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३ दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) हे दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून घातपात करणार होते. खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नांदगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणींचा कपडे धुवताना बुडून मृत्यू