Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'राज ठाकरेंवर खटला दाखल करणार'

Webdunia
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (10:13 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातून पकडून दिलेले ते तीनही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे नागरिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता या नागरिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.
 
या सर्व प्रकाराने संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला असून याविरोधात आता कायदेशीर लढणार असल्याचा निश्चय या नागरिकांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी पुणे पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
 
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे रोशन शेख, बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांच्या घरी शनिवारी सकाळीच मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी तिघांना बांगलादेशी असल्याचे सांगून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर हे तिघेही पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे असल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र एफडीएची (FDA) मोठी कारवाई: पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील २१ हॉटेल्स व बेकरीजचे परवाने निलंबित

Perennial Agriculture : बहुवार्षिक शेती म्हणजे काय?

बिहारमधील तृतीयपंथी समुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर उभारणार; जाणून घ्या याचे मुख्य कारण

हॉकी जर्सीचे 'भगवीकरण': माजी कर्णधाराची रंगाबाबत नाराजी, वादाला तोंड फुटले

माजी बस चालकाच्या घरातून २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त

पुढील लेख
Show comments