Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नर्सचा ड्रेस घालून चिमुकलीला पळवलं

Chimukali ran away wearing a nurse's dress Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (11:29 IST)
नर्सचा ड्रेस घालून चिमुकलीला पळवाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या ससून रुग्णालयात घडला आहे.या रुग्णालयात एका 3 महिन्याच्या चिमुकलीला पळवून नेल्याची वार्ता समोर आली आहे.या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून आरोपी महिलेचा तपास लावून तिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.बाळाला तिच्या आईकडे देण्यात आले आहे.
 
प्रकरण असे आहे की सदर महिला आपल्या पतीसह नर्सच्या वेशात या रुग्णालयात शिरून तिने संधी साधून या 3 महिन्याच्या बाळाला गायब केले.आपले बाळ जवळ नाही बघून बाळाच्या आईने मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडला.घटनेची माहिती मिळतातच गोंधळ उडाला.रुग्णालयातील प्रशासनाने पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी तपास लावून या महिलेला अटक करून बाळाला तिच्या आईच्या सुपूर्द केले.बाळ एकदम सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बागपतमध्ये भाजप नेते आत्माराम तोमर यांचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह घरात सापडला; खुनाचा संशय