Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही : राज ठाकरे

Webdunia
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (16:08 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे उदघाटन झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “राज्य सरकार ज्यावेळेला चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकतो त्यावेळी अशा संस्था उभं राहणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकामध्ये एखादी कला असते. कोणतीही कला असेल ती वाढवणे आवश्यक आहे. जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला लागत नाही. जगात कुठेही बिना डिग्रीचा प्रवास करता येतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
 
“मी जे जे स्कूल ऑफ आर्टला होतो. तीन वर्षानंतर मी शिक्षण सोडून दिलं. त्यामुळे मी ग्रॅज्युएट नाही. मला राजकीय व्यंगचित्रकार व्हायचं होतं, त्यामुळे मला माझे काका बाळासाहेब ठाकरे आणि वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे मी व्यंगचित्रकला शिकलो. या क्षणापर्यंत मला कुणी विचारलं नाही की तुझ्याकडे डिग्री कोणती आहे. त्यामुळे कलेला डिग्री लागत नाही. तुमच्यामध्ये जी कोणती कला आहे, ती जोपासावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कला हेरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणती कला दडली आहे हे हेरून त्याला दाखवली, तर आनंदाने ती कला तो आनंदाने पुढे घेऊन जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

500 दिवसांनंतर गाझाहून रशियन बंधक घरी परतले, पुतिन यांनी भेट घेतली

पंजाबच्या फिरकी हल्ल्याविरुद्ध बंगळुरूच्या फलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल

LIVE: आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही!" मनसेने बॅनर लावले

बुलढाण्यात भाविकांना घेऊन शिर्डीला जाणारी बस उभ्या ट्रकला धडकली,35 भाविक जखमी

आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही!" मनसेने बॅनर लावले,हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक

पुढील लेख
Show comments