Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा ‘डर्टी पिक्चर’ ! PSI शी विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या API वर FIR; गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

'Dirty picture' of Pune Assistant Inspector of Police! FIR on API having extramarital affair with PSI; Attempt to shoot and killपुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा ‘डर्टी पिक्चर’ ! PSI शी विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या API वर FIR; गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न Maharashtra News Pune Marathi News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (15:57 IST)
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट (divorce) झाल्याचे खोटे सांगून विवाहबाह्य संबंध ठेवून एका पोलीस उपनिरीक्षक (WPSI) महिलेवर गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर (API) खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ या एपीआयने चक्क या महिलेच्या ५ वर्षाच्या मुलासमोर फिर्यादीसोबत वारंवार अनैसर्गिक संभोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
हरीष सुभाष ठाकूर  (वय ४०, रा. रेनबो सोसायटी, खडकी) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ठाकूर हा सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. हा प्रकार २०१३ पासून आतापर्यंत कळंबोली, नवी मुंबई (Navi Mumbai) तसेच आरोपीच्या खडकीतील घरी झाला (Pune Crime) आहे.
 
याप्रकरणी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने  खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद
( गु. र. नं. ३१८/२१) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे, अशी खोटी माहिती दिली. फिर्यादीसोबत विवाह केला असता लग्नानंतर आजपर्यंत आरोपीने सतत शारिरीक व मानसिक छळ केला. विवाहबाह्य संबंध ठेवून फिर्यादीसोबत वारंवार अनैसर्गिक संभोग केला. आरोपीने त्यांच्या ५ वर्षाच्या मुलासमोरही फिर्यादीशी अनैसर्गिक संभोग केला. नवी मुंबई येथील राहते घरी २०१५ मध्ये आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या (Attempt to Murder) उद्देशाने त्यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली ती फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला लागून त्यात फिर्यादी जखमी झाल्या होत्या.
 
आरोपीच्या दबावामुळे त्यांनी आजवर तक्रार केली नव्हती. तसेच लग्नाची नोंदणी करण्यास टाळाटाळ करुन विश्वासघात केल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव (Pune Crime) घेतली आहे.पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

1.50 लाखासाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ; सासू-सासऱ्यासह पतीवर FIR