Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit panwar
, शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (21:09 IST)
पुणे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधत शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याचेवेळी दिले.
 
 यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रो रेल कॉर्पोशनचे  व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
 
 विकास कामांची  पाहणी  करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
 
  मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंड गार्डन परिसरात नदीचे कामे करताना भविष्यातील पूरपरिस्थितीचा विचार करावा. अशी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याचा प्रवाह अधिकाधिक वेगाने झाला पाहिजे. पायऱ्यावरील दगडात अंतर राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. या परिसरात विविध जातीची झाडे लावावी. नागरिकांच्या माहितीसाठी त्यांची नावे  इंग्रजीसह मराठीत लिहावीत. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करण्यात करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पतीपासून विभक्त, घटस्फोटाचं 'हे' आहे कारण