Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात गुरुवारपासून घरपोच मद्यविक्री

liquor shops
, बुधवार, 13 मे 2020 (15:22 IST)
दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आदेशाची अंमलबजावणी पुण्यात 14 मे पासून करण्यात येणार आहे.
 
पहिल्याच दिवशी मद्य ग्राहकांचा चागला प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी सुमारे हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी नोंदणी करत ई-टोकन घेतले.
 
पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात ही सुविधा दिली जाणार नाही. तसेच घरपोच मद्य पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, ओळखपत्र, वाहतूक करणे यासाठी परवानगी देण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागणार असल्याने 14 मेपासून सकाळी दहा वाजल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
असे करा रजिस्ट्रेशन
 
ही सुविधा //www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई टोकन प्राप्त करु शकतात. सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटणवर क्लिक करायचे आहे.
 
त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणार्‍या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल. सदर पैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास इ– टोकन मिळेल. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिवारी मान्सून अंदमानात तसेच 11 जूनपर्यंत मुंबईमध्ये धडक