Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

Accident
, मंगळवार, 21 मे 2024 (11:26 IST)
पुण्यामध्ये पोर्श कार अपघात सध्या चर्चेमध्ये आहे. शहरातील एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने पोर्श कारने बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडले. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या 14 तासानंतर अल्पवयीन आरोपीला कोर्टामध्ये काही अटी लागू करून जामीन मिळाला. 
 
पुण्यामध्ये पोर्श कार अपघातात महाराष्ट्र पोलीस एक्शन मोड वर आली आहे. पोलिसांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातून आरोपी अल्पवयीन मुलाच्या रियल इस्टेट डेव्हलपर वडील विशाल अग्रवालला ताब्यात घेतले आहे.  पोलिसांनी आरोपीच्या विडिलांविरुद्ध केस नोंदवली आहे. 
 
ही घटना 19 मे ला घडली असून पुण्यामधील कल्याणी नगर परिसरात एक रियल इस्टेट डेव्हलपरच्या 17 वर्षीय मुलाने आपल्या स्पोर्ट्स कारने बाईकवर असलेल्या तरुण तरुणीला चिरडले. ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. चौकशी दरम्यान लक्षात आले की हा अल्पवयीन आरोपी नशेमध्ये होता. मृत्यू झालेले तरुण तरुणी हे आईटी सेक्टर मध्ये काम करायचे. 
 
पुणे पोलिसांचे म्हणणे आहे की, घटनेच्या चौकशीसाठी अनेक टीम बनवण्यात आल्या आहे. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल FIR नोंदवल्यानंतर पळून गेला होता. क्राईम ब्रांचने विशालला मंगळवारी औरंगाबाद मधून ताब्यात घेतले.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रोलिंगमुळे दोन मुलांच्या आईने आत्महत्या केली, या कारणावरून तिच्यावर सोशल मीडियावर टीका होत होती