Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्नीने मटण बनवण्यासाठी दीड तास लागेल सांगितले म्हणून त्याने तिचे दात पडले

His wife said it would take an hour and a half
, सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (08:21 IST)
पुण्यात पत्नीने मटण बनवण्यासाठी दीड तास लागेल असं सांगितल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तिचे दात पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकरन नाडार असं आरोपी पतीचं नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात प्रभाकरन नाडार हे आपल्या पत्नी सोबत राहतात. दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रभाकरन हा दारू पिऊन घरी मटण घेऊन आला होता. त्यावेळी त्याने पत्नीला मटण बनवून दे, असे सांगितले. त्यावर पत्नी म्हणाली की, माझ्या हातात दुसरे काम असून त्यामुळे मटण तयार करण्यासाठी दीड तास लागेल. यावर संतापलेल्या प्रभाकरने एवढा वेळ कशासाठी लागेल असं विचारलं असता पत्नीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नसल्याने प्रभाकरनला राग आला.
 
या रागातून त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचे दात पडल्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पती प्रभाकरन नाडार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोना रुग्णांची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या एक लाखाच्या आत