Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रॅपिड टेस्ट किती परिणामकारक? भारती विद्यापीठाच्या संशोधनाचे हे आहेत निष्कर्ष

How effective is the rapid test? These are the findings of the research of Bharati University Pune News In marathi coronavirus news in marathi webdunia marathi
, शनिवार, 10 जुलै 2021 (08:11 IST)
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशात बाधित रुग्ण शोधून काढण्यासाठी रॅपिड टेस्टचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.टेस्टची साधी आणि सोपी पद्धत असल्याने गल्लोगल्ली त्याचा वापर करण्यात आला. परंतु पुण्यातील संशोधकांनी संशोधन केले आहे.

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या सात दिवसांमध्ये रॅपिड किट्सद्वारे शंभर टक्के निष्कर्ष मिळू शकत नाही. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर १० ते १५ दिवसांनंतर त्याचे निष्कर्ष मिळतात. रॅपिड अँटिजेन टेस्टवर अतिविश्वास ठेवू नये, संशोधकांचे म्हणणे आहे.

पुणे येथील भारती विद्यापीठाच्या संशोधकांनी १८० कोरोनारुग्णांवर हे संशोधन केले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष इंडियन मेडिकल जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. सर्वात संवेदनशील रॅपिड टेस्टद्वारे अण्विक (मॉलिक्युलर) निदान प्रस्थापित केले जाऊ शकत नाही. परंतु त्याला पर्यायाच्या स्वरूपात वापरले जाऊ शकते,

असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. सिरो सर्वेक्षणा दरम्यान किट्सना तपासणीसाठी वापरले जाऊ शकते. पण किट्सच्या माध्यमातून वैद्यकीयदृष्ट्या रुग्णांचा शोध लावणे खूपच कठीण आहे.अभ्यासादरम्यान प्लाक रिडक्शन न्यूट्रलायझेशन टेस्ट केल्यावर १२५ लोक बाधित आढळले.

गेल्यावर्षी आयसीएमआरच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या कवच किटचे ५६ टक्के पॉझिटिव्ह निष्कर्ष हाती आले होते. चार-पाच किट्सचा वापर करून त्यांच्यात अंतर ठेवण्यात आले.

पहिल्या आठवड्यादरम्यान एका किटद्वारे फक्त ४७.४ टक्के संसर्ग आढळला. दुसर्या आठवड्यात दुसर्या किटद्वारे ८३.२० टक्के संसर्गाची माहिती मिळाली. तसेच युरोइमून किटच्या माध्यमातून ६४ टक्के निष्कर्ष, एर्बलिसा नावाच्या किटद्वारे ५७.६ टक्के आणि कवचच्या माध्यमातून ५६ टक्के निष्कर्ष मिळाले.

देशात बहुतांश राज्यांमध्ये रॅपिड टेस्टच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये या किट्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. देशात आतापर्यंत ४२.३३ कोटी नमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यामध्ये आरटीपीसीआरद्वारे २० कोटी नमुन्यांची तपासणी झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा