Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिंपरी चिंचवड मधील भारतातील पहिले संविधान भवन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित,महेश लांडगे यांचे विधान

mahesh landage
, सोमवार, 14 एप्रिल 2025 (18:23 IST)
facebook mahesh landage
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त शहरात अभिवादनाचे फ्लेक्स जागोजागी लावण्यात आले आहे. भारतीय लोकशाहीचा पाया राज्यघटनेचा सर्वत्र प्रचार, प्रसार आणि जन जागृती होण्यासाठी देशातील पहिले संविधान भवन पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये उभारले जात असून हे संविधान भवन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असल्याचा भावना भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
ALSO READ: पुणे : मुलीने अवैध संबंध उघड केल्यावर आईने अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केला
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 11 मध्ये संविधान भवन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

शहरात 2019 मध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरु करण्यात आला मात्र हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात लांबणीवर गेला. 2022 मध्ये महायुतीसरकार आल्यावर पुन्हा या प्रकल्पाला वेग आला. 
संविधान भवनासाठी प्रस्तावित जागा ‘पीएमआरडीए’कडून महानरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडेही आम्ही पाठपुरावा केला. त्यांनतर संविधान भवनाच्या टप्पा 1 च्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून संविधान भवनच्या निर्माणाचे काम सुरु झाले असून टप्पा 2 साठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे लांडगे म्हणाले 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: ‘शिंदेनी पुन्हा काळी जादू केली!’ आदित्य ठाकरेंचा मोठा दावा