Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

म्युकरमायकोसीसच्या औषध काळ्या बाजारामध्ये विकणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक

म्युकरमायकोसीसच्या औषध काळ्या बाजारामध्ये विकणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक
, शुक्रवार, 18 जून 2021 (21:04 IST)
म्युकरमायकोसीस आजारावरील औषध काळ्या बाजारामध्ये विकणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पुण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींकडून तब्बल बावीस अँफोटेरिसीन बी इंजेक्शन ताब्यात घेण्यात यश आली आहे. सहा हजार रुपयांचं हे इंजेक्शन बावीस ते तीस हजारांच्या दराने विक्री केली जात होती. 
 
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी या प्रकरणी काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून 4 म्युकर मायकोसिस इंजेक्शन्स जप्त करण्यात आली होती. त्याचा अधिक तपास करत असताना पोलिसांना या प्रकरणात शरण बसवेश्वर, सिद्धेश्वर ढमामे यांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूरमधून अटक केली. 
 
या इंजेक्शचा अवैध पुरवठा कर्नाटक गुलबर्गामधून होत असल्याचे पुढील तपासात समोर आले. पोलिसांनी गुलबर्गामधून राजशेखर कासाप्पा भजंत्री याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून म्युकर मायकोसिस आजारावर उपयोगी असणारे इंजेक्शनचे 22 नग असा एकूण 1 लाख 44 हजारांचा औषधांचा साठा जप्त करण्यात आला.आरोपी भजंत्री हा गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गुलबर्गा या शासकीय रुग्णालयात कोविड तसेच म्युकर मायकोसिस विभागात नर्सिंग स्टाफ आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवभोजन थाळी योजनेला मुदतवाढ