Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा एकदा पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन, मात्र अद्याप कोणतीही परवानगी नाही

Webdunia
बुधवार, 23 डिसेंबर 2020 (16:30 IST)
पुन्हा एकदा पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्वारगेट पोलिसांकडे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या वतीने परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे.
 
कोरेगाव भिमा येथील लढाईला २०० वर्ष होत असल्याच्या निमित्ताने शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी कोरेगाव भिमा येथे मोठी दंगल झाली होती. त्याचे महाराष्ट्रासह देशभर पडसाद उमटले होते. या परिषदेच्या आयोजनमध्ये बंदी असलेल्या माओवादी संघटनांचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. यातून देशभरातील अनेक डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. 
 
याबाबत निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले की, एल्गार परिषद हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याला अकारण बदनाम केले गेले आहे. तर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी सांगितले की, लोकशासन आंदोलन या संस्थेकडून परिषदेला परवानगी मिळावी, असा अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा सिजफायरचे उल्लंघन, किश्तवाडमध्ये जैश कमांडरसह 3 दहशतवादी ठार

LIVE: जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल, डंपरखाली चिरडण्याची धमकी दिली

राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यात, सॉल्ट आणि कोहली यांना आर्चरकडून कठीण आव्हान मिळेल

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनचा एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल, डंपरखाली चिरडण्याची धमकी दिली

पुढील लेख
Show comments