Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक : अजित पवार

Many corporators in Pimpri Chinchwad want to join NCP: Ajit Pawar Maharashtra News Pune Marathi News in Marathi Webdunia Marathi
, शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (22:45 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या  तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डॉक्टर डी वाय पाटील ज्ञानशांती शाळेचं उदघाटन पवार यांच्या हस्ते झालं.यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी खळबळजनक दावा केला.
 
पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक असल्याचं स्पष्ट अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र इलेक्टिव्ह मेरिटवर प्रवेश दिला जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.त्यामुळे महापालिका निवडणुकी आधी भाजपला धक्का बसणार का याची चर्चा  सुरु झाली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड्याच्या विकासासाठी अनेक वर्ष काम केलं. पण 2013-14 मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा होती, त्यामुळे चांगलं काम करुनही राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावं लागलं.पण आता भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UPI पेमेंट करताना सावधगिरी बाळगा,धोका होऊ शकतो,या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या