Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात दारु पिताना शिवीगाळ केल्यावरुन तरुणाचा खून; तिघे ताब्यात

Murder of a youth for abusing alcohol in Pune; Three in custody Maharashtra News Pune Marathi News Webdunia Marathi
, मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:22 IST)
दारु पित बसले असताना शिवीगाळ केल्याने तिघांनी धारदार हत्याराने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तरुणाचा खून केला.मंदार जोगदंड (वय २३, रा. साने गुरुजी वसाहत, आंबिल ओढा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सिंहगड रोडवरील ( सई हेरिटेज सोसायटीचे मंदिराजवळ  पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुभम दत्ता अडसुळ (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
 
त्यावरुन पोलिसांनी सोन्या खुळे, राजू कोतवाल, इजगद, चेतन बनसोडे (रा. सर्व दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना ताब्यात घेतले आहे. मंदार, सोन्या खुळे व इतर हे सोमवारी रात्री दारु पित बसले होते. त्यावेळी मंदार याने सोन्या खुळे याला शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरुन खुळे याने त्याच्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावले. खुळे व राजू कोतवाल यांनी धारदार हत्याराने व साहिल इजगल व चेतन बनसोडे यांनी मंदार याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात मंदार याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BNP PARIBAAS:ब्रिटनच्या कॅमेरॉन नूरीने गिग्चा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, आता त्याची स्पर्धा निकोलोजशी होईल