Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेलापुरात होणार MPSC चे नवे कार्यालय, 282 कोटींच्या खर्चास मान्यता

New office of MPSC
, शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (08:12 IST)
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील नियोजित इमारतीसाठी राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या इमारतीसाठी 282 कोटी 25 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, एमपीएससीच्या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
बेलापूर येथे एमपीएससीची इमारत बांधण्यासाठी शासनाकडून भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच या इमारतीच्या बांधकामासाठी 2019 मध्ये 97 कोटी 47 लाखांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र एकत्रित विकास नियंत्रण नियमावली 2020 च्या आधारे उपलब्ध चटई क्षेत्र निर्देशांक आणि बांधकाम योग्य क्षेत्रफळ मोजमाप करण्याच्या पद्धतीतील सुधारित बदल यामुळे बांधकाम क्षेत्रात झालेली वाढ विचारात घेऊन नियोजित इमारतीच्या बांधकामासाठी एमपीएससीकडून 291 कोटी 18 लाख 58 हजार रुपये इतक्या सुधारित अंदाजपत्रकाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. आतापर्यंत केवळ व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक आणि त्या अनुषंगाने खर्च करण्यात आला असल्याने उच्चाधिकार समितीने 282 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार आधीची प्रशासकीय मान्यता रद्द करून नव्या प्रस्तावाच्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सख्या बहिणीचा नवऱ्याच्या खून प्रकरणी सख्या भावांना आजन्म कारावास