पुणे जिल्ह्ययातील पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड-१९ रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून वायसीएम रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या २० केएल ऑक्सिजन टँकला (२० हजार किलो लिटर) शासनाकडून परवानगी मिळाली आहे.
यामुळे वायसीएम रुग्णालयासाठी यापुर्वीच्या १० केएल व नविन २० केएल असा एकुण ३० केएल ऑक्सिजन आयसीयुसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात अधिकचे १२५ आयसीयु ऑक्सिजन बेड नव्याने तयार होवुन त्याची भर पडणार आहे.
पुढील २ ते ३ दिवसात हे काम पुर्णत्वास येणार असुन रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर ३० हायफ्लो ऑक्सिजनचे एचडीओ युनिटही तयार करणेत येणार आहेत. वायसीएम रुग्णालयात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या परिसरात नव्याने 20KL ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यात आली होती.
त्याला मंजुरी मिळाली असुन त्याचा फायदा शहरातील रुग्णांना होणार आहे. या ऑक्सिजन टँक प्रकल्पाच्या निर्मितीमुळे रुग्णालयामध्ये कायमस्वरुपी ऑक्सिजन/ आयसीयू बेडसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. तसेच, यापुर्वी रुग्णालयात जम्बो सिलेंडरमार्फत होणारा ऑक्सिजन पुरवठा आता टँकद्वारे होणार असल्याने जम्बो सिलेंडर राखीव राहणार असल्याची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.