Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पुण्यातून लाईट आणि पाणी गायब

bijali
, बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (09:15 IST)
पुणे – रावेतच्या 400 KV विद्युत केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातल्या जनतेला आज पाणी पुरवठा तसच वीज संकटाला सामोरं जावं लागणार आहे. लाईटच नसल्यामुळे दोन्ही जुळ्या शहरातल्या पाणी पुरवठ्यावरही मोठा परिणाम झालाय. विशेषत: रावेतमधून पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा होता. त्यामुळे त्या शहरातल्या अनेक भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. तसच दोन्ही शहरातून पहाटेपासूनच लाईट गायब आहे. त्याचाही परिणाम शहरातल्या पाणी पुरवठ्यावर होण्याची चिन्हं आहेत.
 
पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी ६ पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pro Kabaddi: प्रो कबड्डी सीझन 8 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हे तीन संघ सर्वात मोठे दावेदार