Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नैराश्यातून मातेने केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली

नैराश्यातून मातेने  केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली
, सोमवार, 22 जून 2020 (15:48 IST)
नैराश्यातून एका महिलेने केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळें शहरात सुरू असणारे आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहली असून, त्यात कोणाला जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.
 
यासना मुकेश बकसानी (वय ३६, रा-प्लॉट नंबर १०५ वानवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, यासना यांचा 13 वर्षांच्या मुलावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला किडनी आणि डायबेटीसचा त्रास आहे. दरम्यान त्यांचे पतीला कॅन्सर होता. त्यात त्यांचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे.
 
तर मुलावर देखील गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. यामुळे त्या नैराश्यात होत्या. रविवारी त्या मुलाला उपचारासाठी घेऊन आल्या होत्या. मुलावर पाचव्या मजल्यावरील 106 क्रमांकाच्या खोलीत उपचार सुरू होते. त्यामुळे त्या नैराश्यात होत्या, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
 
दरम्याम पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. ही माहिती समजताच त्यांनी समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा झोपल्यावर कोरोना झोपतो तर मृत्यूनंतर मरतो...पाकिस्तानचा Coronavirus वर ज्ञान जाणून हैराण व्हाल