Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे : महिलांच्या छेडछाड प्रकरणी ‘झेपटो’च्या मॅनेजरसह 4 ते 5 डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

Webdunia
बुधवार, 7 जून 2023 (21:20 IST)
पुणे :विमाननगर परिसरातील ललवाणी प्लाझा येथे झेपटो कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या वेगवेगळया कार्यालयात ये-जा करणाऱ्या महिलांची छेड काढल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह चार ते पाच डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात 48 वषीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
 
झेपटो कंपनीचे मॅनेजर सुरज गायकवाड (वय 35), स्टोअर मॅनेजर मोईन हन्नुरे (33) व इतर अनोळखी चार ते पाच डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2022 पासून 29 मे 2023 पर्यंत घडलेला आहे.
 
तक्रारदार महिला काम करत असलेल्या ऑफिसच्या इमारतीच्या खाली झेपटो कंपनीचे गोदाम आहे. त्याठिकाणी तक्रारदार व त्यांचे सहकारी इतर महिलांसोबत कामावर येत-जात असताना कंपनीचे मॅनेजर व स्टोअर मॅनेजर हे कंपनीत काम करणाऱ्या डिलीव्हरी बॉय यांना चिथवाणी देत व फुस लावत होते. त्यानुसार तक्रारदार व इतर महिला कामावर येता-जाता डिलिव्हरी बॉय त्यांना नेहमी अश्लील भाषा वापरणे, त्यांचा पाठलाग करणे. तसेच जाणीवपूर्वक महिलांसमोर कपडे बदलत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होते. डिलिव्हरी बॉईजच्या या कृत्याला कंटाळून अखेर या महिलांनी पोलिसात धाव घेतली. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस कोळळुरे करत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

भिवंडीत गणपती विसर्जनाच्या दगडफेक यामुळे दोन गटात हाणामारी, पोलिसांनी केला लाठीचार्ज

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचा कुर्ल्यात अपघात

धुळ्यात गणपती विसर्जनाच्या वेळी भीषण अपघात, 3 मुलांचा मृत्यू

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

आयपीएस अधिकारी मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

पुढील लेख