Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे : मनपाचा बिगारी जेव्हा लाखाची लाच मागतो

pune mahapalika
, शनिवार, 1 जुलै 2023 (22:14 IST)
कोणी किती लाच मागावी याला कोणताही धरबंद राहिलेला नाही. बिगारी असलेल्या इसमाला चक्‍क एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. साधा बिगारी लाच घेताना सापडल्यामुळे या प्रकरणाची राज्यात सर्वत्र चर्चा होत आहे.
 
याबाबत माहिती अशी, की तक्रारदार हे पुणे महानगरपालिकेतच मुकादम म्हणून सन 2022 मध्ये निवृत्त झाले आहेत. त्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी प्रवीण दत्तात्रय पासलकर या बिगार्‍याने त्यांच्याकडे चक्‍क एक लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार मुकादमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पडताळणीनंतर या विभागाने पुणे महानगरपालिका कार्यालयाच्या आवारातच सापळा रचला असता प्रवीण दत्तात्रय पासलकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे हे करीत आहेत.
 
पुणे विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्‍त अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Edited  By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निधी जाहीर करुन अपघाताचे प्रश्न सुटणार नाहीत’ ; शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला