rashifal-2026

पुणे : वीज चोरीवर आता ड्रोनची नजर

Webdunia
शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (08:13 IST)
पुणे :वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करून उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणा-या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सणसवाडी येथे मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ््या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा. लि. व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा. लि. या दोन उच्चदाबाचे तर मे. भगवान ट्यूब प्रा. लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल आणि पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा. लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे कायमस्वरूपी बंद केला होता तर इतर दोन वीज जोडण्यांचा वीजपुरवठादेखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंद आहे.
 
महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेला अतिउच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरू केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खब-यांमार्फत मिळाली. ही वीजचोरी मोठी असल्याने आणि संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली.
 

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील मदरशाजवळ दहशतवादी स्फोट, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

मुंबई कोर्टाने पोलिसांना गँगस्टर कुमार पिल्लईला हाँगकाँगला पाठवण्याचे आदेश दिले

LIVE: नाशिकमधील 18 हजार जन्म दाखले संशयास्पद

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली

शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन

पुढील लेख
Show comments