Dharma Sangrah
✕

पुणे जिल्ह्याला पुन्हा हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुरात चार जण वाहून गेले

Webdunia
गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (15:44 IST)
पुणे जिल्ह्याला गुरूवारी पुन्हा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पाऊस कोसळेल असेही स्पष्ट केले.
 
शिवाजीनगर येथील वेधशाळेत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी ७६ मिलीमीटर पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा या वेळेत झाला. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात अक्षरश: वेढले गेले. रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. 
 
पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला. विजांचा गडगडाटासह हा पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहनही केले आहे.
 
दुसरीकडे पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार जण वाहून गेले आहेत.  दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये ही घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरु आहे. दुचाकीवरुन जात असताना चौघे ओढ्यात वाहून गेले .
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे जण दोन दुचाकीवरुन ओढ्यातून चालले होते. भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेले आहेत. शहाजी गंगाधर लोखंड (52), सुभाष नारायण लोंढे (48), अप्पासो हरीचंद्र धायतोंडे (55) आणि कलावती अप्पासो धयातोंडे (48) अशी त्यांची नावे आहेत. सुभाष लोंढे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: तुकाराम मुंडे यांनी दूध आणि तूप खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इशारा दिला

मालाडमध्ये मेकअप आर्टिस्टच्या घरात कोकेनचा साठा सापडला; २१.१३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

World Kindness Day 2026: जागतिक दयाळूपणा दिवस

तुकाराम मुंडे यांनी दूध, तूप आणि तेल खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला

"माझ्या भावाचे निधन झाले त्या दिवशी हा विषय संपला" सुप्रिया सुळे यांनी दोन गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या

पुढील लेख
Show comments