Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बाप्परे औषधात रबराचे तुकडे आढळले,औषधाची विक्री थांबविली

बाप्परे औषधात रबराचे तुकडे आढळले,औषधाची विक्री थांबविली
, शुक्रवार, 15 जुलै 2022 (21:10 IST)
पुण्यात रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. 
 
पुण्यात रक्ताचा कर्करोग असलेल्या रुग्णाला देण्यात येत असलेल्या औषधात रबराचे तुकडे आढळून आले आहेत. पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. डेनिलाईट पी नावाच्या औषधात रबराचे बारीक बारीक तुकडे आढळल्याने FDA कडून या औषधाची विक्री थांबवण्यात आली.
 
रबराचे तुकडे यामध्ये आले कसे? हे औषध देताना रुग्णालयाने औषध पाहिलं नव्हतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं FDA नं म्हटलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, 'म्हणून' विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्यात आले