Festival Posters

पुणे : डी.वाय.पाटील कॉलेजच्या प्राचार्यांना बजरंग दल कार्यकर्त्यांनी केली मारहाण : घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2023 (21:24 IST)
पुणे : येथील तळेगावमधील डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याने महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
सविस्तर माहितीनुसार, डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या महाविद्यालयातील स्त्रियांचं प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे का लावले आहे ? कॉलेजमध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात? हे आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांन मारहाण केली आहे. या व्हीडीओत त्यांचे कपडे फाटल्याचे दिसत आहे.
 
 हा प्रकार थांबवून प्राचार्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदाराने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहे. स्त्रियांच्या प्रसाधनगृहात  सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याच्या प्रकरणाचा अहवाल अजून प्रलंबित असताना ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेवरून हा वाद झाला आहे. महाविद्यालय प्रशासनाने मात्र अद्याप काहीही भाष्य केले नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आश्विन पौर्णिमेला करू नयेत अशा चुका

Kojagiri Purnima 2025 कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजनाची पद्धत

कोजागरी पौर्णिमा 2025 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या

नैसर्गिकरित्या गुबगुबीत गाल मिळविण्याचे नैसर्गिक उपाय

कोजागरी पौर्णिमेला पारंपरिक बासुंदीला द्या चॉकलेट ट्विस्ट; मुलांची फेव्हरेट डिश

सर्व पहा

नवीन

LIVE: राऊत म्हणाले ठाकरे बंधूंमधील वैयक्तिक आणि राजकीय संबंध मजबूत झाले

पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची विक्रमी कामगिरी, नीता अंबानी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले

मनसे सोबतच्या युतीबाबत संजय राऊत यांचे विधान

अपघात प्रकरणात गौतमी पाटील यांना पुणे पोलिसां कडून क्लीन चिट

EV कार 4 ते 6 महिन्यांत किमती कमी होतील नितीन गडकरी यांनी जाहीर केले

पुढील लेख
Show comments