सध्या राज्याला पावसाने झोडपले आहे.राज्यातील अनेक भागात हवामानात बदल होत आहे. हवामान विभागाने पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यात पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रातील संपूर्ण कोंकणपट्टीला ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी आणि रायगडला रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 35 ते 40 किमी प्रति तासाने वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मासेमाऱ्यांना गुजरातकिनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात गुरुवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातही काही भागांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत पावसाची नोंद झाली. यामध्ये भोर तालुक्यात सर्वाधिक 49 मिमी पावसाची नोंद झाली