Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक : पुण्यात पैलवानाची भर चौकात गोळ्या घालून हत्या

Shocking: Palawana shot dead in Bhar Chowk in Pune
पुणे , शनिवार, 25 डिसेंबर 2021 (22:09 IST)
जुन्या वादातून ही शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे भर चौकात एका पैलवानाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागेश सुभाष कराळे ( वय ३८, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या पैलवानाचे नाव आहे.
 
चाकण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ ही घटना घडली. नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात बसत असताना लगतच फोर्ड फिगो वाहनात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेशवर चार गोळ्या झाडल्या. या घटनेत नागेश गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी