Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अयोध्येतील मंदीर निर्माणासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाखांचा निधी

अयोध्येतील मंदीर निर्माणासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाखांचा निधी
, मंगळवार, 19 जानेवारी 2021 (07:24 IST)
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा निधी अभियानासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ५१ लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. पुण्यामध्ये या अभियानासाठी आलेल्या पू.साध्वी ॠतंभरा जी यांच्याकडे पहिल्या टप्प्यातील ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राम मंदिर निर्माण कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, अशी प्रार्थना पू.साध्वी ॠतंभरा जी यांनी गणराया चरणी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे पू.साध्वी ॠतंभरा जी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी  पू.साध्वी ॠतंभरा जी यांनी गणरायाला अभिषेक देखील केला. तसेच त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. 
 
पू.साध्वी ॠतंभरा जी म्हणाल्या, लवकरच संपूर्ण जग अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्यतेचे दर्शन करेल. परमेश्वराच्या सर्व शक्ती  दगडूशेठ गणपती मंदिरावर आर्शिवादाचा वर्षाव करीत आहेत. रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाच्या चरणी जे मागितले होते, ते चार महिन्यांतच मिळाले. आता राममंदिराच्या माध्यमातून हिंदूंचा जो संकल्प आहे, तो निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत. तसेच फक्त मंदिर न बनविता मंदिरे पुन्हा कधीही उध्वस्त होऊ नये, अशा भारताची निर्मीती करुया, असेही त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

“उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण........